STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

2  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

आरोळी

आरोळी

1 min
13.8K


क्रांतीवीर हो, प्रज्ञावान हो

कष्टकरी, शेतकरी, सैनिक हो

तुम्हां आज वंदना

भारताच्या वैभवाला

तुमचीच प्रेरणा


दुःख, दारिद्रय नष्ट करू या

प्रत्येक जीवाला वाचवू या

उज्ज्वल भविष्य त्यांचे उजळू या

माणुसकीचे नाते जोडू या


विज्ञानाला सत्य मानू या

अध्यात्मची सांगड घालू या

विश्व शांतीचा संदेश देऊ या

कर्तुत्वाने जीवन जगू या


कष्ट करण्याची हिम्मत धरु या

आळसाला जीवनातून घालवू या

सत्याचाच मार्ग धरू या

अंधश्रद्धा मनातून काढू या


वाईट प्रथेला विरोध करू या

समाजसुधारकांचा आदर्श ठेवू या

भारताला बळकट बनवू या

मानवधर्म सर्वजण पाळुया


एवढी माझी ठरो आरोळी

बदला मने सगळी

प्रेमाने ,सत्याने आपण

नांदू सर्व भूमंडळी

भारतीयांच्या मना, मनात

विश्व भावना जागवू

संयम,नम्रता, ईमानदारी

रसाळ वाणीने जीवन जगू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational