STORYMIRROR

Smita Murali

Inspirational

4  

Smita Murali

Inspirational

आरोग्य जपूया

आरोग्य जपूया

1 min
245

तरूण आहे आधारस्तंभ देशाचा

मजबुत भक्कम पाया भविष्याचा

तारुण्य म्हणजे उसळत रक्त

उत्साहाचा अखंड झराच फक्त


आमच्या बालपणी तरुण जायचे तालमी

अंगात असायची रग आणि चेहऱ्यावर गुर्मी

बाहु असायचे पिळदार बळकट

सारं शरीरचं असायचं दणकट


मोबाईल टिव्ही तंत्रज्ञानाचा आला जमाना

यंत्रासमोरचा तरुण काही केल्या हलेना

मानसिक ताण वाढत चालला

व्यांधीनी मग तरुण ग्रासला


अकाली वृद्धत्व तरुणांना लागले येवू

पार्लर जीमला मग लागले जावू

वेळीच जाणा रे आरोग्याचा मंत्र

योगासनाचं अवगत करा रे तंत्र


देशाला आहे तुमच्याकडून अपेक्षा

आळसाने शरीराची नका करु उपेक्षा

कसदार आहाराचं करा सेवन

योगाने बनवा निरोगी जीवन!


तरुण तरुणींनो सोडा आता आळस

नियमित वेळेत आहार घ्या सकस

जाणुनी महत्व नित्य करा योगा

निरोगी जीवनासाठी आरोग्याला जागा!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational