आर्जव
आर्जव
अरे माझ्या राज्यकर्त्यांनो
का घडविता जाती-धर्मावरून दंगल ,
आपला देश तुम्हांस नसेल माहिती
पण आहे कितीतरी पवित्र आणि मंगल !!
या देशाच्या रक्षणाकरिता
एकत्र येऊन सीमेवर लढतो आम्ही ,
पण घरात बसून चुकीचे संदेश, आदेश देऊनी
लढविता माणसां-माणसांना तुम्ही !!
तुम्हांस हे ठाऊक आहे का?
आपल्या देशाची आहे संस्कृती महान ,
प्रत्येक जाती-धर्माची व्यक्ती
हीच आहे आपल्या देशाची शान !!
विनवितो आज मी तुम्हांस
हे आर्जव गोड मानून घ्या ,
देशातल्या साऱ्या जनतेला
सुखी समाधानाने राहू द्या !!
नका करू हो जाती-धर्मावरून
घाणेरडे अन् गलिच्छ राजकारण ,
नाहीतर ही जनताच एके दिवस
असेल तुमच्या समूळ नाशाचे कारण !!
