आपल्या माणसांतील परकेपणा
आपल्या माणसांतील परकेपणा
दिसला तरीही स्पष्ट
बोलता येत नाही कुणा
आतल्या आतच पोखरतो
आपल्या माणसांतील परकेपणा.
भास गोड स्वच्छ दुधाचा
दिसत नाही मीठाचा खडा
चकचकीत दिसणाऱ्या भिंतीचा
जाणवतही नाही उघडा तडा.
आभासी मुखवटे नाना प्रकारचे
चढवतो हर एक इथे बेमालूमपणे
संधी हवीशी मिळतात लिलया
निघतात परस्परांचे सगळे उणेदुणे.
चक्काचूर होतात सगळ्या भावना
घडा सुखाचा अवघ्या इथे उताणा
याची डोळा मरण दिसते स्वप्नांचे
दिसता आपल्या माणसांतील परकेपणा.