आपली शर्यत
आपली शर्यत
प्रसिद्धीचे वलय अनुभवत राहिलास
प्रकाशमय तेजात ढवळत राहिलास
आयुष्याच्या शर्यतीत जिंकत राहिलास
करुनि शत्रूवर मात प्रेमाने जग जिंकत राहिलास
सागराचे मोती जसे अमूल्य असतात
तसे मान सन्मान मिळवत राहिलास
शिखरावर नेहमी तेजाचे सूर्य बनून चमकत राहिलास
तू मिळवत राहिलास
मी गमावत राहिले
तू जिंकत राहिलास
मी हरत राहिले
तू उंचच उंच झेपावत होतास
मी फक्त तुला क्षितिजावर पाहत राहिले
तू दुरावत राहिलास माझ्यापासून
मी तुला दुरावताना पाहत होते....
