STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

आपली जिल्हा परिषद शाळा...

आपली जिल्हा परिषद शाळा...

1 min
225

चार भिंतींचे विद्यामंदिर

सोबत पाटी-पेन्सिल, खडू-फळा..

गुणवत्तापूर्ण शिक्षण देते

आपली जिल्हा परिषद शाळा..


"क ख ग घ.." गिरवूनी

वाचायला शिकवी खळाखळा..

जीवनास आकार देते

आपली जिल्हा परिषद शाळा..


बेरीज-वजाबाकी, गुणाकार

भागाकाराने बदलवते जीवनकळा..

डिजिटल शिक्षणाची कास धरते

आपली जिल्हा परिषद शाळा..


"ए बी सी डी.." वर्णमालेसह

लावी इंग्रजीचा लळा..

मूल्यशिक्षणाचे धडे देते

आपली जिल्हा परिषद शाळा..


वैविध्यपूर्ण उपक्रमांची बरसात

फुलवी चैतन्याचा मळा..

स्वच्छता-आरोग्याचा मंत्र देते

आपली जिल्हा परिषद शाळा..


निसर्गाचे जागरूक भान ठेवुनी

सांगते पर्यावरण संवर्धनाकडे वळा..

वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगते

आपली जिल्हा परिषद शाळा..


संगीत-कला जोपासुनी

बिंबवी हसा-खेळा, शिस्त पाळा..

अभिव्यक्त होण्याची संधी देते

आपली जिल्हा परिषद शाळा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational