आपलेपणा
आपलेपणा
हसत खेळत असायचे तेव्हा घर सारे
सुख- दुःख सर्वांचे सारखे असायचे
रुसवा-फुगवा नसायचा कधी नात्यात
प्रेम, आपुलकीने भरलेले घर असायचे
आपल म्हणून प्रत्येकाची काळजी घेतली जायची जीवनात "परके" असे कोणी नसायचे
कमीपणा घेतला की आपलेपणा
आपोआप वाढतो तेव्हा हे कुठेतरी कळायचे
आपल जिथे मानल तिथे नाही सोडायची साथ
वाद- विवाद, कधी अबोला तिथेच
असतो जिथे आपलेपणाची असते बरसात
तेव्हा हे सर्वांना पटायचे
आता नाही राहिला तो आपलेपणा
भासतात का? परके आपलेच लोक सारे
घेतात मोहूनी जे फुलपाखराप्रमाणे
आतून मात्र काटे असतात टोचणारे
काही चांगल केल तरी किती सहज विसरल्या जात नकळत झालेल्या चुकीला मात्र
गिरवून सांगितल्या जात
चुक नसते तरीही आरोप होतो पण त्यावेळी आपल्या बाजूने मात्र कोणी नाही हे पाहून मन थोड दुःखी होत
आपलेपणाने वागणे हा दोष म्हणावा की,
अजूनही माणूस ओळखण्यात
आपणच कमी पडतोय म्हणून स्वतःला दोष द्यावा...?
हे मनाला समजावयाच राहून जात
मग वाटत आयुष्यातले किती
दिवस दुसऱ्यांसाठी जगायच
जे आपलेपणा दाखवतात
त्यांच्याशी नात टिकवून ठेवायच
बाकीचे जे आहेत ते परके होते आणि राहणार परकेच जी आपली माणस, त्यांचाच विचार करत
हेच नात आयुष्यभरासाठी जपायच...
