STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

आपला ग्रुप नापास..!

आपला ग्रुप नापास..!

1 min
17.4K


आमचा ग्रुप परीक्षेत नापास...!

आमचा ग्रुप परीक्षेत नापास झाला

याचे मला खूप कौतुक वाटले

आपला तो बाळू आणि

दुसऱ्याच ते कार्ट याचे दर्शन झाले


सरकारच शैक्षणिक धोरण

इतकं काही वाईट नाही हे पटले

आठवी पर्यंत बिंधोक पास प्रवास

याचे प्रत्यन्तरात दर्शन आज आले


परिपक्वतेची शहानिशा झाली

सारे प्राथमिक अवस्थेत हे पटले

तुम्ही म्हणाल हे परीक्षण कसले

जे जाणले ,जे दिसले तेच कथीले


आज माझा वाढ दिवस

अपेक्षा काहीच नाही, नव्हती

पण साधी नजरही कोणाची

माझ्या कवितेवर नाही पडली


तेंव्हा म्हंटल हे अस कस झालं

ग्रुपच कचरा पेटीत रूपांतर केंव्हा झालं?

मेम्बर भरपूर ,पोष्ट भरपूर जणू महापूर

पण पोहोच का नाही ,ते नाही कळल..!


म्हणून म्हंटल अभ्यासक्रम चांगला

जणू प्रत्येकाचा वेगळाच बंगला

घर राहील शाबूत घरपण गेलं पळून

म्हणून तर नाराजीने कविता आली जुळून


या निमित्ताने इथून पुढे

शाबूत घराचं घरपण जपूया

पुन्हा वाचनाकडे थोडा वेळ देऊया

विचारांनाही थोडे सजग करूया


जाताना पश्चिमेला रवी म्हणाला

नाराज नको होऊ बॅनरने काय फरक पडतो...?

वाढ दिवस वेड्या तुझा आहे त्यांचा नाही

जेंव्हा त्यांचा वाढदिवस तेंव्हाच कल कळेल...!


धन्यवाद...!

शनिवार शुभ सायंकाळ...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational