आनंदाने जगता आलं पाहिजे...
आनंदाने जगता आलं पाहिजे...
आनंदाने जगता आलं पाहिजे,
कुणाचा दबाव नसला पाहिजे,
कुणाचा प्रभाव नसला पाहिजे,
आयुष्य असं असायला पाहिजे....
खेळीमेळीचे वातावरण पाहिजे,
राजकारण तर नसायला पाहिजे,
एकमेकांविषयी आदर असला पाहिजे,
आयुष्य असं असायला पाहिजे....
साैहादॆ स्नेहभाव जपला पाहिजे,
सहकायाॆची वीण असली पाहिजे,
माणुसकीची जाण असली पाहिजे,
आयुष्य असं असायला पाहिजे.....
जगण्यापुरताच पैसा असायला पाहिजे,
ध्येयाचा बाण सुटलाच पाहिजे,
जास्त हव्यास नसायला पाहिजे,
आयुष्य असं असायला पाहिजे.....
