आनंद
आनंद
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
आनंद हृदयी, आनंद श्वासात वसावा
हर्षकारी आनंद आपल्या ध्यासात असावा
वसंत बहर सजला असला सृष्टीत
आनंद दृष्टीत सामवावा
निजरूप ध्यान मनात भगवंताचे नाव वसावे
कर्मात दिसतील चराचरी सकल अस्तित्व आनंदाचे
नाही त्यासाठी झुरण्यापेक्षा आहे तो क्षण उधळावा
दुःखाचा धुरळा खोल गाडावा
क्षण क्षण मोलाने उलगडावा
आनंद या जीवनाचा मुक्तपणे संचित करूनी देहात भिनवावा
जगताना उधळून सारे रंग
तारे तोडून साठवून घ्यावे पदरात
मनसोक्त जगून घ्यावं अनमोल या जीवनात
संताचिये वचन "मन करा रे प्रसन्न"
आलेल्या क्षणांतून वेचावा आनंद
जडवून घ्यावा सर्वांनी हा छंद
हसून बोलावे, बोलून हसावे
हास्याचे कारण ठाई ठाई पेरावे
क्षणीक हे जीवन क्षणीक सुख
कोण जाणेल कधी उभे ठाकेल दु:ख
म्हणूनच आनंद प्रत्येक क्षणात मानावा प्रत्येक क्षण आनंदाने जगावा असो कितीही खडतर आयुष्याचा प्रवास त्यातूनही आनंदाने जगण्याचा मार्ग शोधावा
कारण आनंद ही मागण्यासारखी गोष्ट नाही तो मानणे हीच खूप मोठी गोष्ट आहे पण कोणीच मानत नाही हेच आज या घडीला सर्वांसमोर स्पष्ट आहे
बघा ना कधी तप्त उन्हाळ्यातही
आलेली पावसाची छोटीशी सर ही आनंद क्षणभर का होईना देते तर कधी सकाळी तुमच्या आवडीच्या माणसांकडून मिळाली कॉम्प्लिमेंट दिवस अप्रतिम करते
कधी कोणी केलेल्या प्रशंसा मनाला समाधान देऊन जाते कारण काहीही असो आवश्यक आहे ते आनंदी राहणं...
आनंदाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या आहे
कोण सर्व सुखी ऐश्वर्य दारी असून दुखी असू शकतो
तर कोणी चंद्रमौळी झोपडीत राहून आनंदी
आयुष्याचा प्रत्येक क्षण हा तेवढाच आनंद देऊन जातो जेवढा तुम्ही घेऊ इच्छित असता... बरोबर ना...
आज गंधात अक्षरांच्या मनधुंद झाले बेभान लेखणीच्या स्वाधीन मग झाले सुवास दरवळला चहुकडे शब्द सुमनांचा
आनंद या माझ्या उन्मुक्त भावनांचा
