आम्ही सावित्रीच्या लेकी
आम्ही सावित्रीच्या लेकी
आहे उरी अपर हिम्मत
आहे सचोटी आणि नेकी
स्वाभिमानी आहोत फार
आम्ही सावित्रीच्या लेकी
कणखर तितक्याच हळव्या
आहोत संयमी आणि विवेकी
डगमगत नाही संकट समयी
आम्ही सावित्रीच्या लेकी
जन्मतःच बाळकडू मिळाले
खपायची नाही उगाच शेखी
खोड मोडणे जाणतो नीट
आम्ही सावित्रीच्या लेकी
मर्यादा सोडली नाही आम्ही
तोडले बंधन जे अतिरेकी
संस्कार तिचे विसरलो नाही
आम्ही सावित्रीच्या लेकी
