आम्ही भारतीय
आम्ही भारतीय
भारताचे नागरिक
आम्ही भारतीय लोक
अंधश्रद्धा व्यसनाचे
आम्ही सक्त निर्मूलक
सचोटीचा बाणा असे
प्रामाणिकपणा अंगी
चारी मुंड्या चीत करु
युद्धामधे शत्रूलागी
भिन्न जाती भिन्न धर्म
भिन्न सण परंपरा
विविधतेमधे ऐक्य
स्नेहभाव हो अंतरा
देशासाठी लढताना
धर्म पंथ जात नसे
लढवय्या भारतीय
हाच भाव मनी वसे
स्वाभिमान देशभक्ती
सळसळे रक्तातून
झटू सारे देशासाठी
स्फूर्ती तनमनातून
