STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

5.0  

Shila Ambhure

Inspirational

आम्ही भारतीय नारी

आम्ही भारतीय नारी

1 min
950


भारतभूच्या लाडक्या कन्या

आम्ही आहो भारतीय नारी.

शक्ती ,बुद्धी लढवुनिया होतो

संकटांना आम्ही सदैव भारी.


लखोजी जाधवांची जिजाऊ शूर

जन्मले शिवाजी तिच्या पोटी.

जय जिजाऊ जय शिवराय

एकच गर्जना आमच्या ओठी.


'मेरी झांसी कभी न दुंगी'

ठणकावून सांगे इंग्रजांशी.

मर्दानी राणी लक्ष्मी लढली

दामोदरला बांधून पाठीशी.


काढुनी मुलींची शाळा पहिली

पाया स्त्री शिक्षणाचा रोविला.

अनंत कोटी नमन माझे त्या

क्रांतीज्योती सावित्री मातेला.


पंतप्रधान ती पहिली महिला

ओळखते सारी भारत भूमी .

नेहरूंची गुणी कन्या इंदिरा

सारे देती तिजला सलामी.


मंगेशकर घराण्याची शोभा ती

गाणं कोकिळेचा मिळाला मान.

लता दीदी साऱ्यांची आवडती

सुरेल कर्णमधुर गातसे छान.


ऐश्वर्या जाहली विश्वसुंदरी

भासे नयनी अथांग सागर.

लावण्याची शोभते खाण

चित्रपट सृष्टी करते जागर.


भारतीय वंशाची कल्पना चावला

वयाने जरी असली लहान.

अंतराळ यांनी बसुनी नासाच्या

अवकाशी कन्या झाली महान.


कस्तुरबा ,रमा, मुक्ता ,बहिणाई

अजरामर अशी अनेक नावे.

शब्दही जिथे पडती अपुरे

गोडवे तयांचे किती बरे गावे.


आई ,बहिण आणिक मुलगी

रूपे आहेत आमची कितीतरी .

प्रसंगी प्रकटे दुर्गा, रणचंडिका

अशा आम्ही भारतीय नारी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational