आले नववर्ष
आले नववर्ष
आले नववर्ष
संमिश्र भावना
विविध कल्पना
तरी शंका नाना
कोरोना शत्रूचा
झाला नायनाट
असे वाटताच
ये ओमायक्राँन
सज्ज राहू सारे
घेऊया काळजी
योग्य राखू दूरी
स्वच्छता सवयी
करु रोगावर
मात सर्वजण
धर्म मानवता
पाळू सारेजण
नवीन वर्षात
प्रार्थना देवासी
निरोगी ठेवावे
तूची सकलांसी
