आला श्रावण आला श्रावण
आला श्रावण आला श्रावण
धरित्रिची काहिली तापता
पर्जन्ये अवनी मोहरता
वसुंधरेला खुलविण्यासी
आला श्रावण आला श्रावण
घननीळ तो आला बरसत
नद्या धबधबे तोषत गर्जत
कुंदवात तो दरवळण्यासी
आला श्रावण आला श्रावण
सोनसळी हिरवाई घेऊन
सृष्टी आली फुलुनी बहरुन
नवचैतन्य फुलविण्यासी
आला श्रावण आला श्रावण
कृषीवल झाले मनी हर्षित
सुवासिनी नित साज खुलवित
जनमानस रिझविण्यासी
आला श्रावण आला श्रावण
नवपरिणीत ती मोदे नहाता
तन मन त्यांचे बहरुन येता
नवमीलन फुलविण्यासी
आला श्रावण आला श्रावण
ओलेती नवप्रतिभा खुलवित
साज तयाला मोदे घालत
कविमन हर्षे फुलवित
काव्य बहरविण्यासी
आला श्रावण आला श्रावण
