STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy Others

3  

Sarika Jinturkar

Fantasy Others

आला पाऊस

आला पाऊस

1 min
10

आला पाऊस ,पाऊस 

संगे घेऊन बेभान वारा 

चिंब- चिंब झाली धरा 

अन् हर्षला निसर्ग सारा


 सर-सर बरसे सरीवर सरी

 झर- झर बरसती रेशीमधारा 

टप- टप पडती थेंब टपोरे 

संगे शुभ्र मखमली गारा  


पानं अन् पान शहारुन जाती

 मातीचा तो सुगंध न्यारा 

गडगड मेघ गर्जती अन्

 सुखावून जाई गार वारा


आला पाऊस, पाऊस 

तृप्त झाली ही वसुंधरा 

हिरवा शालू परिधान करी

भासे जणू सौख्याचा सोहळा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy