आजीचा गौप्यस्फोट
आजीचा गौप्यस्फोट
हजारवेळा सांगे आजी
पैशाचे ना झाड मुला
मोठा होशील तसे तसे बघ
उमजत जाईल सत्य तुला
भूत खवीस अन नसे चेटकीण
वेताळ नि राक्षसही नसे
बालमनाला रिझवण्यास रे
लोकच रचती सर्व तसे
नव्हते काही साधन बाबा
रंजन करण्या त्या काळी
आम्हीच केली तयार पात्रे
गुपित सांगते दे टाळी !!
चिंधी दे तू कायम फेकून
सोन्याला कर आपलेसे
तसेच वागत आम्ही आलो बघ
उत्तम जे ते जपलेसे !!!
