आजी
आजी
मायेचा पाझर तिच्या डोळ्यात वाहायचा
सुरकुतलेल्या चेहर्यावरला आनंद पहायचा
थरथरते हात तिचे गालावर फिरायचे
लाडिकवाने तिच्या कुशीत मी शिरायचे
आठवणींना उजाळा देत उजळणी व्हायची
तशी ती पाणवलेल्या डोळ्यांकडे पाहायची
डोळे पुसायला मग पुढाकार ती घ्यायची
मायेने पाठीवर ती हात फिरवत राहायची
अडचणीत नेहमी साथ तिची असायची
जवाबदारी पडताच खंबीर ती दिसायची
उतारवयाच ही तिला भय नाही वाटत
एकटेपणाच सावट मात्र उरी तिच्या दाटतं
आयुष्य सरता सरता माणसं पुष्कळ जोडली
आपल्या जिवलग तिची मनं मात्र मोडली
खंगलेले शरीर जरी सोबतीला तिच्या आहे
डोळे मात्र वाटेकडे नजर लावून पाहे
येणारे जाणारे खुशाली जरी पुसतात
तिला लेकरांचे भास समोर दिसतात
