आजच्या युवा मुली
आजच्या युवा मुली
सोळाव्या वयाची जगा ती
पंचविशी ने घेतली आहे
झाल्या मूली सज्ञान साऱ्या
सावध वागताना दिसत आहे
समाजात जगण्याची कला
केली त्यांनी आत्मसात
घेतले त्यांनी पालकांना
आज स्वतःच्या विश्वासात
घेऊया आयुष्याची उंच भरारी
सुवर्ण स्वप्न त्या पाहू लागल्या
ध्येयाने मनाच्या त्यांच्या इच्छा
आपसूकच आज नव्याने पूर्ण झाल्या
आई बाबांचे चिवट अनुभव
देऊन असतात त्या पाठीशी
निर्णय मात्र घेताना केव्हाही
तेच त्यांच्या असते गाठीशी
जोडीदार निवडण्याचा तो
हक्क स्वतःकडे ठेवलाय
मान्य केले पालकांनी हे
कित्येकदा अनुभव आलाय
आशीर्वाद देतो आम्ही
संसार त्या करोत सुखाचा
पडलीच गरज तर कधी
हात देऊ नेहमीच मदतीचा
