STORYMIRROR

Manisha Awekar

Tragedy

4  

Manisha Awekar

Tragedy

आजच्या काळापुढील प्रश्न

आजच्या काळापुढील प्रश्न

1 min
232

प्रश्न प्रश्न आणि प्रश्न !!

किती प्रश्न आ वासून

आज उभे ठाकलेत

कसे सोडवावे म्हणून


मोबाईलचा विळखा

सा-यानांच पडलेला

बोलायला कुणालाच

वेळ नाही उरलेला


लिव्ह इन रिलेशनशिप

बोकाळू लागली आहे

लग्नसंस्थेचे पावित्र्य

भंग पावले आहे


व्यसनांची तर आता

इथे फँशन झालीय

नवे नवे ब्रँड घ्यायची

चढाओढ लागलीय


वृद्धाश्रमात वेटिंग लिस्ट

खूपच वाढते आहे

मनःशांतीची जागा आता

उदासीनतेने घेतली आहे


आजच्या जोडप्याला

मूल नको आहे

गोकुळासारखे घर

आता सुने झाले आहे


प्रश्न सोडवायला गेले तर

गुंता वाढतो आहे

प्रगती झाली पण......

सुख हरपले आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy