STORYMIRROR

Nalanda Wankhede

Tragedy

4  

Nalanda Wankhede

Tragedy

आजची स्त्री

आजची स्त्री

1 min
353


विवेक विचारांनी

ओलांडते चाकोरीबद्ध जीवन

मनाची घालमेल

क्षणोक्षणी


चाणाक्ष हुशार

नवनवीन शिखरे पादाक्रांत

कर्तव्ये नखशिखान्त

पदोपदी


नाजुक अनुजा

नाही बाहुले हातातले

निर्णय कठोर

प्रांजळ


चतुर सर्वज्ञानी

राखते सर्वांचा मान

रीतिरिवाज भक्कम

समाजाचा


मानाचा उपक्रम

चालावा संपूर्ण जीवनभर

जन्मदात्री धरनीवर

स्वयंभू


कठिण परिस्थितित

सावारते जीवनाचा गाडा

बळाचे पाठबळ

मृत्युपर्यन्त


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy