आजची स्त्री ती…
आजची स्त्री ती…


सरस्वतीचे रुप ती,
लक्ष्मीचा साज ती.
धर्माचे पालन ती,
त्यागाची मूर्ती ती.
तरीही, स्त्री भ्रुण हत्येची बळी ती,
आजची स्त्री ती...
कुटुंबाचा सन्मान ती,
सर्मपणाचे शुभ्र कमल ती.
संस्कारांची शिदोरी ती,
कतृत्वाचा तारा ती.
तरीही, हुंडा रूपी मानधनाची बळी ती,
आजची स्त्री ती...
कर्तव्याच्या रथाची चालक ती,
ध्येयाचा सुगंध ती.
दृढ निश्चय ती,
आर्दशाचे उदाहरण ती.
तरीही, गुलामगिरीच्या दावणीला बांधलेली ती,
आजची स्त्री ती…
शौर्याची गाथा ती,
धगधगती मशाल ती.
यशाकडे अखंड झेप ती,
धाडसाची ज्योत ती.
तरीही, अगणित अत्याचारांची बळी ती,
आजची स्त्री ती…
परीस्थीतीशी निर्भय ती,
आत्मविश्वासाची किर्ती ती.
विरोधाचे खंडन ती,
स्वप्नांची पूर्ती ती.
तरीही, भोगवादी मानसिकतेच्या करमणुकीचे साधन ती,
आजची स्त्री ती…
आजची स्त्री ती…