STORYMIRROR

kishor zote

Inspirational

0  

kishor zote

Inspirational

आजची स्त्री ( काव्यांजली )

आजची स्त्री ( काव्यांजली )

1 min
7.5K


आजची स्त्री

काळाच्या असे पुढे

यशाची चढे

पायरी

प्रेम, वात्सल्य

झरा तो अखंडीत

नांदे घरात

सौख्य

नवे तंत्रज्ञान

केले आता अवगत

नित्य हाताळत

संगणक

कोणतेच क्षेत्र 

नाही आता सुने

ओलांडला तिने

उंबरठा

राखते सदा

तीच मेळ नात्यांचा

क्षण आनांदाचा

घरात

कामे साऱ्यांची

करे एक हाती

स्वप्न रंगवती

संसाराचे

आजची स्त्री

भेटे प्रत्येक रूपात

सामावले तिच्यात

भावविश्व


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational