STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

आजची नारी पुरुषाला भारी

आजची नारी पुरुषाला भारी

1 min
227

फुले दांपत्याने उघडले

शिक्षणाचे दार

शिक्षण नोकरीमुळे

प्रगती हो फार


उच्च पद मिळवूनी

समतेस सिद्ध 

निर्णयशक्ती प्रगल्भ 

वर्चस्वही सिद्ध 


अष्टभुजा नारी आजची

आहे स्वयंसिद्धा

आत्मनिर्भर असे ती

उत्तम व्यवस्था 


अर्थार्जन करुनी नारी

स्वबळावर उभी

भूदल नौदल हवाईदल

क्षेत्रे गाजविली


झाशीची राणी , ताराबाई

अहिल्याबाई थोर

आदर्श तयांचा ठेवूनी

मार्ग हितकर 


घराचे घरपण टिकवूनी

ज्येष्ठांना आदर

कुटुंबाला प्रेम देऊनी

मायेचा पदर


समतेला टाकूनी मागे

पुढे प्रगतीपथावरी

श्रेष्ठत्व सिद्ध करुनी

आजची नारी पुरुषाला भारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract