STORYMIRROR

Supriya Devkar

Action Inspirational

3  

Supriya Devkar

Action Inspirational

आजचा युवा

आजचा युवा

1 min
225

सळसळत रक्त अंगात 

धमन्या ज्याच्या ताठ 

आजच्या युगाचा युवा 

ना दाखवे कुणा पाठ ॥१॥


चतुर हरहुन्नरी देखणा 

परी नाते त्याचे मातीशी 

व्यक्तिमत्त्वाच्या छटा बहू 

परी वागणे बरे नीतीशी ॥२॥


शिवरायांचा आदर्श मनी 

ठेवती स्त्रियांचा आदर 

संकटात पुढे उभारून 

संरक्षणास असती सादर ॥३॥


यशाची शिखरे गाठण्या 

प्रयत्नांची करी पराकाष्ठा 

युवा असा घडतो आहे 

जगण्यावर ज्याची पूर्ण निष्ठा ॥४॥


आजचा युवा आहे

उज्वल भविष्य जगाचे 

मेहनतीने पाय रोवलेले 

पालणकर्ते नव्या युगाचे॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action