आज तू..
आज तू..
रुसवा रोजचा, सोडना आज तू..
हाय एकांत हा , बोलना आज तू..
कूस बदलू किती, रात्र सोसू किती
वेळ दवडू नको, मिलना आज तू..
हा पहारा किती, तारकांचा इथे
मज स्वप्नांतून, भेटना आज तू..
एकटा मी तरी, सांग बोलू किती
शब्द माझे प्रिये, तोलना आज तू..
कैद व्हावी तुझ्या, दोन डोळ्यांमध्ये
मी करू का गुन्हा, सांग ना आज तू..