आज-कालची दिवाळी
आज-कालची दिवाळी
नाही राहिली आता
पहिल्यासारखी दिवाळी
नाते-संबधांची झाली
पूर्णपणे होळी
सुनेला नाही आवडत
सासूकडे जायला
मुलगाही तयार नसतो
आई-वडिलांना समजून घ्यायला
तु तुझ्या घरी
अन् मी माझ्या घरी
आपुलकी नाही उरली
आता कोणाच्या उरी
फोनवरचं नुसत्या
शुभेच्छा अन् शुभेच्छा
कुणी घरी यावे
अशी नसते आत्मियतेने इच्छा
दिवाळी म्हणजे
असायचे पाहुणेचं पाहुणे
आता म्हणतात लोक
कोण कुणाचे मेहुणे
नाही राहिला आता
आपुलकीचा फराळ
उरला नाही नात्यात
लाडूंचा गोडवा
फट-फट होतात
फटाक्यांसारखे वेगळे
स्वार्थी बनलेत
मानव सगळे
शेतकऱ्यांच्या घरी यायची
हसत हसत दिवाळी
निसर्ग खेळतोय आज
वेगळीच खेळी
म्हणून दिवाळीचा गोडवा
वाटत नाही तेवढा गोड
करावी लागते गरिबांना
थोडक्यात तडजोड
