आज काही अजब घडलं
आज काही अजब घडलं
बरीच वर्ष पाऊस पडत होता
पण थेंब भिजवू शकले नाहीत
आज काही अजब घडलं..
कोरडं काही उरलं नाही
थेंबात पाणी होतं
कधी पापणी वर थेंब होते
आज काही अजब घडलं
पाऊस आत बाहेर
आठवणींचा भार विरला
उमेद बहरून आली
आज काय अजब घडलं
स्वता: ची नवीन ओळख आली
पाऊस तोच होता
मी ही तोच होतो
आज काही अजब घडलं
शब्दांची समज...सहज झाली

