आईवडीलांची जागा....
आईवडीलांची जागा....


आई वडिलांची जागा
कशी काढू भरून,
कशाला त्यांच्या आठवणीत
जगायचे आपण कुढून...
त्यांचे अढळ स्थान
जपायचं आपल्या ह्दयात,
त्यांच्याप्रती सर्वस्व
वाहायचं आपल्या प्रेमात...
त्यांना नित्य स्मरून
स्वप्न त्यांचं जगायचं,
आता आठवणीत नाही तर
कृतीतून दाखवायचं....
त्यांचे आशीर्वाद असतील
कायम आपल्यासोबत,
त्यांच्याच साक्षीने
जपावे आपले गणगोत...
आई-वडिलांची जागा नेहमी
असते अढळ स्थान,
आठवणीने नाही तर
कृतीने लिहा आयुष्याचे पान...