आईचं काळीज
आईचं काळीज
हरवले धुक्यात गाव
विसरले कसे क्षण ते
ओंजळीत धुसर असे
आठवणी त्या मायेच्या
दूर नसे मायेचा पदर
तरीही होत असे माझे
अश्रुंनी ओले हे नयन
तिच्या डोळ्यात माझे मन
तरळत विश्व भासिक
वाटे आई असे पाठी
पहाता वळून मागे..
ती तरअसे तिच्या घरी
वाटे बोलाव मन भरून
किती बोलाव फोन वरून
भेटावं जावून क्षणात..
तरीही जाबबदार मन
नाही देत होकारार्थी मन
तीच समजावते मग
आजार आहे फैलावला
मन आवर आणी वीडियो कॉल कर
कस काय जमत आईला
आजुन ही अस वाटत..
एक मन तिच्या समजुतीने घायाळ होत
एक मन तिच्या मायेसाठी आसुसत..
कितीही मोठे झाले तरी
आईच काळीज ते आईलाच कळत..❤💞
