आईची व्याकूळ ती नजर
आईची व्याकूळ ती नजर
ती आईची व्याकुळ नजर
मला विचारत होती प्रश्न हजार
कधी करशील का रे
माझ्या त्या मायेची जाण...??
आटला रे जीव हा माझा
तुझ्या उभ्या आयुष्यासाठी आज
आठवेल का तुला रे ही आई जिने
प्रेमाने भरवलेले तुला मायेचे चार घास...??
मोठा हो अौकशवंत हो
देई आशिर्वाद तिचे ते कष्टकरी हात
करी ती माझ्या उज्वल
आयुष्यासाठी देवाकडे दिव्यांची आरास...
ती आईची व्याकुळ नजर
मला विचारत होती प्रश्न हजार
आठवेल का रे तुला ही तुझी आई
जेव्हा उद्या नसेल उद्या या जगात…