STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Classics Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Classics Inspirational

आईची आठवण...

आईची आठवण...

1 min
44

आई तुझी आठवण ,होते क्षणोक्षणी अनावर होते दुःख,डोळयात पाणी....।।
 गेलीस.कशी आई सोडून तू मला कठे पाहू सांग मी,कुठे शोधू तुला घेईन कोण पोटाशी मज, सांग तुझ्यावाणी....।।
कसं आवरु दुःख मी माझ, तुला कसं विसरु गेलीस तू झालं तुझ पोरकं ग लेकरु झोप येईना डोळयाला उघडीच पापणी....।।
 तुझ्या लेकराला आई गेलीस तू सोडून, जीव माझा झाला वेडा रडून रडून नको अन्नाचा घास जाईना ग पाणी....।।
माझ्यावर आज दुःखाचा कोसळला डोगर आई तुझा बाळाला या पडेना विसर कोसळले आकाश,फाटली ग धरणी....।।
का रे देवा तुला माझी दया नाही आली आम्हा माय लेकराची ताटातुट केली ये ग आई माझ्यासाठी ये ग तू धाऊनी....।।
 दिनरात झुरतो आई आई तुझ्यासाठी करतो नवस मी देवाला दे जन्म तुझ्यापोटी पूनर्रजन्म घेऊ दोघं नऊ महिन्यांनी.....।।

 गायकवाड आर.जी.दापकेकर 9689338010


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract