STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Tragedy

2  

Poonam Wankar ( पूरवा )

Abstract Tragedy

आई

आई

1 min
53

अजूनही त्याच उकिरड्यावर जगतोय मी आई,

जन्म देऊन जेथे फेकून गेलीस तू मला...

कुठल्याश्या उच्चभ्रू समाजात नाव मिळविण्यासाठी

आणि मी..., मी मात्र तडफडत राहिलो

तुझ्या थेंबभर दुधासाठी..!!


तुझ्या मायेची कूस मिळण्याआधीच

काट्यांशी नाळ जोडली गेली माझी..,

असंख्य मुंगळ्यांनी चावे घेतले,

आणि कुत्रीही सरसावल्या लचकी तोडण्यासाठी...;

त्याचेच व्रण जपतोय, अजूनही माझ्या अंगावर

तुझ्या क्रूरतेची आठवण राहावी म्हणून...!!


पण, तरीही आई..

तुझा राग येत नाही मला,

हो..! पण किव करावीशी वाटते

की आई होऊन सुद्धा, तुला या नात्याला मुकावे लागते..!


म्हणतात,

'आई' सारखं सुंदर

जगात दुसरं काही नाही

' स्वामी तिन्ही जगाचा 'तिच्याविना उगाच भिकारी नाही ;

हो..! पण हे सारं काही तुझ्या वाट्याला कधीच येणार नाही

कारण.. आई म्हणवून घेण्याची

तुझी साधी लायकीही नाही..!!


आज ओरडून सांगावस वाटतंय..

त्या साऱ्याच आयांना...,

समाजाच्या लाजेखातर,

ज्या टाकून देतात आपल्या बाळांना..!

अरे...,

फेकायचंच होत, तर जन्मालाच का घातलंस??

नऊ महिने उदरात वाढविण्याआधीच

का नाही मारून टाकलंस...??

निदान तिटकारा तरी वाटला नसता

'आई' या शब्दाचा

अन कधी रागही आला नसता

असं लाचार जगण्याचा..!!


तरीही..., आज आई..;

तुझे पांग फेडावे वाटतात,

जन्माला घातलंस मला..,

याचे आभार मानावे वाटतात..!

जन्मच दिला नसतास तर..,

नाण्याची दुसरी बाजू कळलीच नसती

" माता न तू वैरीणी " ही ओळ कधी उलगडली नसती

ही ओळ कधीच उलगडली नसती...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract