STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

4  

Shila Ambhure

Inspirational

आई

आई

1 min
264


(मुक्तछंद)


आई...

सगळ्यात ,मायेचा ,हक्काचा शब्द

बोलण्यातील पहिलाच

आणि वेदना झाल्यावरही 

तोंडातून आपसुक बाहेर पडणारा

अगदी जवळचा एकच शब्द

आई...

शब्द दोन अक्षरी

पण सामावलीय यात

ऊर्जा सारी

आई ,माय, अम्मी, बाई ,आऊ

शब्द असो कोणता

उच्चारताच वाहते ओसंडून

माया अन् ममता.

आई...

जपत नाही कधीच स्वतःला

पण काळजीने वाढवते

पोटातील अंकुराला.

आणि जपते 

तिच्या शेवटच्या श्वासापर्यन्त.

एक आई.....

कधीच करत नाही आत्महत्या

परिस्थितीला त्रासून

लेकरांना सुखात वाढवते

स्वतः कष्ट उपसून.

काय वर्णावा तिचा महिमा

शब्दही पडतात थिटे

सर्वांनी केले मान्य

'न ऋण जन्मदेचे फिटे'.

आई...

मागते ना कधीही

तुमच्या धनात वाटा

लाडिकपणे हाक मारा'आई'

आनंद होतो तिला

गगनाहुनि मोठा.

किती जरी वाढू वयाने

आईसाठी असतो 'बाळ'

तिच्याशीच असते बांधलेली

प्रत्येकाची नाळ.

म्हणून रोजच करावा साजिरा

मातृदिनाचा सोहळा

द्यावा प्रेमाचा आधार

बोलावा ना शब्द 'आगळा'

निसर्गालाही मान्य 

आईची थोरवी सारी

सांगणे न लागे

'स्वामी तिन्ही जगाचा, 

आईविना भिकारी'

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

   एक रचना माझी

  शीला अम्भुरे बिनगे

      (साद)

  परतुर ,जालना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational