STORYMIRROR

Pratiksha vaibhav Kulkarni

Inspirational

4  

Pratiksha vaibhav Kulkarni

Inspirational

आई

आई

1 min
505


परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी पोहोचता आले नाही

म्हणूनच त्या विधात्याने निमार्ण केली आई

सतत असे काळजी पिलांची तिच्या मनी

तिच्याएवढे महान जगात नसे कुणी

तिच्याच मदतीने पिल्लू आकाशी भरारी घेई

म्हणूनच त्या विधात्याने निर्माण केली आई!


बाळावरचं प्रेम तिचं असे एवढं निस्वार्थी

उदरात तिच्या असतानाच केली तिने माया त्या पिलावरती

आपल्या मुलांबाळातच आयुष्य तीच जाई

तिच्या उदरी जन्म घेऊन धन्य मी होई

म्हणूनच त्या विधात्याने निर्माण केली आई!!


मोठे होताच पिलांना स्वर्ग त्यांचा गवसे

मग याच आईचे प्रेम वाटू लागते नकोसे

वृद्धाश्रम त्या मातेचा आधार होई

पिलांची काळजी मात्र असे तिच्या ठायी ठायी

म्हणूनच त्या विधात्याने निर्माण केली आई!!


काबाडकष्ट करत तिने पिलाला जपले

पिलाच्याच अस्तित्वाने तिचे सारे आयुष्य व्यापले

परतफेड त्या कष्टाची अशी मात्र नसावी

वृद्धाश्रमाची पायरी तिने ढळत्या वयात न पहावी

ऋण तिचे फेडण्यात पूर्ण जन्म अपुरा होई

म्हणूनच त्या विधात्याने निर्माण केली आई!!


माया तिची अनमोल असे प्रेम तिचे अमुल्य

मायेचा तो निखळ झरा असे अमृततुल्य

नसे मौल्यवान तिच्याहून संपूर्ण जगात काही

म्हणूनच त्या विधात्याने निर्माण केली आई!!

म्हणूनाच त्या विधात्याने निर्माण केली आई!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational