STORYMIRROR

Latika Choudhary

Inspirational Others

3  

Latika Choudhary

Inspirational Others

$ आई $

$ आई $

1 min
27.3K


आई,

धान्याची रास ओलांडून

पडलेलं तुझं पहिलं पाऊल

माझ्या बापाचं घर

आबादानी करून गेलं....!

'परक्याचं धन' म्हणून

माहेराला परकी झालीस

माझ्या बापाला तुझं

'तन मन धन' अर्पण केलं......!

नावागावासकट मिटलीस

'बाईपण'आणि 'आईपण' जपलं

तुझ्या मौनातलं सारं काही

काळाच्या पापणीआड लपलं......!

बापासंगे राबताना तुझी

काया झिजत होती...

बा चा घाम अन तुझ्या आसवांनी

दुष्काळातही माया वाढत होती......!

तुझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या बघून

गाठोड्यातलं दुःख खदखदून हसलं

पण जेव्हा जगाच्या डोळ्यात

तुझ्यासाठी आसवं पाहिलीत तेव्हा

नियतीच काय,दुःखही फसलं......!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational