STORYMIRROR

Rahul Salve

Inspirational

3  

Rahul Salve

Inspirational

आई

आई

1 min
165

आई खरंच तू महान आहेस

माझ्यासाठी देवाहून श्रेष्ठ आहेस

वाढवूनी उदरी नऊ महिने मला

सोडल्यास असंख्य कळा

म्हणूनच की काय मला तुझा लळा

दिलीस माया अन् प्रेम लडिवाळेत

सांभाळूनी सदा मला तुझियापाशी

केलीस माझे संगोपन अन् संस्कार

घरातही तू राबतेस सकाळपासून

तहान भूक विसरतेस स्वतःपासून

अमर्याद रेलझेल ही कामाची

सोसतेस तू दरदिवशी

विश्रांती न घेण्याचा तुझा मानस

खरचं आईविना जग

आहेच नेहमी भिकारी

जीवनाची प्रत्येक झोळी

तुझ्याविना आहे रिकामी

तूच व्हावी माझी जन्मोजन्मी माता

हीच माझी तुझ्यापाशी मनोकामना...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational