STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

3  

Kishor Zote

Inspirational

आई तू सृजनतेचा मेरू महान

आई तू सृजनतेचा मेरू महान

1 min
166

आई तू सृजनतेचा मेरू महान


महान तुझ्या कर्तृत्त्वाला मी

मी करतो दोन्ही हाते वंदन

वंदन तुझेच जीवन जसे

जसे झिजत जाणारे चंदन


चंदन सुगंध दरवळे घरात

घरात तुझे वावरणे निर्मळ

निर्मळ सर्वांप्रती भावना तुझ्या

तुझ्या भावभावनाही प्रेमळ


प्रेमळ तुझे रागावणे ही असे

असे काळजी घरातील सर्वांची

सर्वांची मने सांभाळणे आणि

आणि ती कसरत असे दोरीवरची


दोरीवरची वाळलेली कपडे काढणे

काढणे केर , कचरा, रांधणे, वाढणे

वाढणे खाऊ घालणे चिऊचा घास

घास लेकराच्या मुखी भरवणे


भरवणे चारा पाणी दावनीला

दावनीला जनावरे असे बांधलेली

बांधलेली ऋणानुबंधे नाती अशी

अशी आई ती राब राब राबलेली



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational