STORYMIRROR

Ganesh Punde

Inspirational

3  

Ganesh Punde

Inspirational

आई तुझे ऋण

आई तुझे ऋण

1 min
263

तू माझ्या जीवनाचा शिल्पकार तू माझी आई

या जन्मी आई तुझे ऋण मी कधी फेडूच शकणार नाही

कोणी म्हणे आई असते मायेचा सागर

कोणी म्हणे आई असते गजबजलेले घर

कोणी म्हणे माया अपार तिची कधीही संपत नाही

या जन्मी आई तुझे ऋण मी कधी फेडूच शकणार नाही

आई माझी भोगून कष्ट मला जगविले 

अशा अभाग्याचे जीवन तिने सजविले

तुझ्या कृपेने संपून जाईल ही दुःखाची खाई

या जन्मी आई तुझे ऋण मी कधी फेडूच शकणार नाही

आई तुझा राजा आहे तुझा गुन्हेगार 

थोर मोठा असूनही आहे तुझ्या डोई भार

जमलंच तर होऊन पाहीन तुझ्या पालकीचा भोई

या जन्मी आई तुझे ऋण मी कधी फेडूच शकणार नाही

माझ्या मुळे होतो आई सर्वांना ग त्रास

कुणा ठावं कुठुनी आला असा वनवास

जगतोय हिम्मत सोडत नाही गात तुझी अंगाई

या जन्मी आई तुझे ऋण मी कधी फेडूच शकणार नाही

घडो तुझी सेवा मला आहे जोवर श्वास 

जन्म भर भरवीन तुजला माझ्या सुखाचा घास

अर्पून देतो माझे जीवन अंती तुजिया पाई

या जन्मी आई तुझे ऋण मी कधी फेडूच शकणार नाही.

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational