आई माझी जननी
आई माझी जननी
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः
आई माझी सर्वस्व
आई माझी जननी
तुझ्या पोटी जन्म घेऊन
झाले मी वाघिणी
तू माझी पहिली गुरु
शिकवली मला चतुराई
जीवनाच्या या प्रवासात
कशी करू मी उतराई
तू मला धाडस दिलेस,
माझ्या पंखांना बळ दिलेस
जगण्याचे सामर्थ्य दिलेस
आकाशालाा गवसणी
घालण्याचे धैर्य दिलेस
तुझे पांग मी फेडू कसे
या जन्मी ते शक्य नाही
माझ्या पोटी ये तू
दुसरा जन्म घेऊन
आई होण्याचं भाग्य लाभू दे
सात जन्म सेेवा करेन मी
जे या जन्मी शक्य नाही
