Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Fantasy

3.5  

Sarika Jinturkar

Fantasy

आई कुठे काय करते?

आई कुठे काय करते?

1 min
44


नऊ महिन्यांच्या वेदनांचे घाव 

ती अगदी सहजपणे सोसते 

तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला ती जपते  

तरीही,आई कुठे काय करते?  


मुलांच्या संगोपनात 

ती विसरून जाते स्वतःला

 बोल बोबडे शिकवित सारे जी

 आपल्याला जग दाखविते 

तरीही, आई कुठे काय करते ?


आपले संगोपन करतांना प्रेम,आदर प्रामाणिकपणा या गुणांची सांगड जी घालते  

सामाजिक बांधिलकी आपल्याला जपायला शिकवते तरीही, आई कुठे काय करते?  


रागात कधी मारते देखील, पुन्हा जी मायेने जवळ घेते  

ओघळणारे अश्रू प्रेमाने पुसत जी आपल्याला घास भरवते

 तरीही, आई कुठे काय करते?  


पहाटे पासून ते झोपेपर्यंत आपल्या कुटुंबासाठी जी राबराब राबते आपल्याला इजा झाली तर तिची रात्रीची झोप हरपते  

सुख दुःखात आपल सांत्वन करून जीवन जगण्यासाठी आपल्याला जी विश्वास देते 

तरीही, आई कुठे काय करते ? 


आपल्या जन्मापासून 

आपल्यासाठी जी खूप काही करते झटते, प्रसंगी लढते सुद्धा

तरीही त्याची जाणीव 

कधी करून देत नाही  

आपल्यासाठी जी 

सर्वस्व पणाला लावते

 तरीही, आई कुठे काय करते?  


खूप कष्टाने आपल्याला 

लहानाचे मोठे करते

 जीवाचे रान करून आपल्याला जी घडवते कठीण प्रसंगी ती स्वतःला सावरत हिंमतीने पुढे जाते कुणालाच कळत नाही तिच्या मनातील दुःख  

सर्व नाती ती अलगदपणे जपते 


गुणगान इतके आहे तिचे की, शब्दही अपुरे पडते  

तरीही, आई कुठे काय करते ?


Rate this content
Log in