STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

आगमन वसंताचे

आगमन वसंताचे

1 min
166

पानगळ शिशिराची

आता थांबली गं सये

पालवी ही वसंताची

झाडांवरी फुलली गे  (1)


राजा ऋतुंचा वसंत 

वसुंधरेला खुलवी

कशी नटली अवनी

साज हिरवा लेऊनी  (2)


फुलझाडे बहरली

गंध गेला रानोमाळी

वसंताच्या स्वागताला

धरा कशी ही खुलली (3)


शमविण्या उन्हासही

वसंतीय वारे येती

झाडे वेली तरारल्या

सुगंधही बरसती    (4)


आला आला हा वसंत

उत्साहाने दिमाखाने

सृष्टी सौंदर्य सोहळा 

रंगे वसंतरंगाने   (5)



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract