आदीशक्ती
आदीशक्ती
आदीशक्ती ती एक जिच्या गाथा अनेक
लढण्याचे बळ आणि जिंकण्याची निष्ठा सुरेख
तिचा संस्कृतीने तिच्या जागृतीने नाही घडला फक्त शिवबा
एक तर घडले स्वराज्याचे मावळे कित्येक
तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म
सर्वधर्मसमभाव हे तिचे कर्म
रणरागिणीचे रूप ती, होती सकलांची माऊली
तिच्या राज्यात प्रजा सारी होती सुखावली
समर्पणाची भावना ठेवली तिने
विविध भूमिकेत वावर
तांना
हक्काच क्षितिज सांभाळले
सकलांच्या कल्याणा
तिचे नाम स्मरता एकच भाव
मना मनात गुंजतो
माणुसकीचा धर्म प्रत्येकाच्या अंगी कुठेतरी रुजतो
तिच्या शौर्याच्या गाथा ऐकवाव्या नव्या पिढीला
संस्कारांचा ठेवा जपत घडवावे
प्रत्येक स्त्रीने नव्या शिवबाला
सामर्थ्यवान कर्तुत्ववान ममतादायी, प्रेरणादायी वात्सल्याचा वाटावा तिचा अभिमान
अतिशय सक्षम, निर्भयी या आदिशक्तीला माझा प्रणाम