आधुनिक म्हातारी -चल ग स्कुटी भुर्र भुर्र भाग २
आधुनिक म्हातारी -चल ग स्कुटी भुर्र भुर्र भाग २
काही वर्षांनी गम्मत झाली
आधुनिक म्हातारी गावी आली,
लेकीला भेटायच ठरवलं तीने
स्कुटी वरून भुर्रर्र निघाली.
जंगलात तिला पण वाघोबा भेटला
चिकटला होता तो व्हॉट्स ॲप ला,
वाघोबा म्हणाला खातोच तुला
अपडेट्स टाकतो फेस बुक ला.
म्हातारी म्हणते लेकीकडे जाते
बर्गर पिझ्झा खाऊन घेते,
शॉपिंग थोडीशी करून येते
मग तुझा मी ब्रेकफास्ट होते.
म्हातारी निघाली स्कुटीवरी
जाऊन पोहोचली लेकी घरी,
खाऊन झाला बर्गर पिझ्झा
म्हातारीने केली खूपच मज्जा.
घरी जायची झाली वेळ
म्हातारीला वाटलं संपला खेळ,
वाघ पण आता शहाणा झालाय
भोपळ्याला तो समजून गेलाय.
स्कुटी वरून निघाली म्हातारी
आणि वाघाला गेली सामोरी,
वाघोबा आरामात लोळत होता
आणि गेम खेळत होता.
म्हातारी म्हणाली ओरडून त्याला
वाघोबा वजन लागलंय वाढायला,
डाएट तुला लिहून देते
योगा तुझा करून घेते.
फिट झालास की पुन्हा येते
मगच तुझा ब्रेकफास्ट होते,
वाघाला पटलं, केलं त्याने गुर्र..
म्हातारी पळाली स्कुटीवरून भुर्रर्र..
डाएट करत वाघोबा बसले
म्हातारीने एकदा पुन्हा फसवले,
नवीन म्हातारीने केलं सेम
पुन्हा वाघाशी खेळला गेम.
वाघोबा राहिला दूर दूर
चल ग स्कुटी भुर्र भुर्र …
