आभासी जग (तुमच्या शहरातील जीवन
आभासी जग (तुमच्या शहरातील जीवन
आहे आयुष्य सुंदर
भान असू द्या तयाचे
आव्हाने येऊ द्या रोज
त्यास सामोरे जायचे||१||
करे निष्क्रिय मेंदूला
रुजे कीड विनाशाची
आभासी जग कठोर
नसे काळजी मनाची||२||
धावपळीचे हे जग
तंत्रज्ञानास महत्त्व
नको जाऊस आहारी
विसरून सारी तत्त्व||३||
प्रेम मैत्री टिकवावी
आपुलकी रुजू द्यावी
देवघेव विचारांची
समोरासमोर व्हावी||४||
कोडगे आभासी जग
दूर करे नात्यांना
जरा ओळखावे सत्य
नसे महत्त्व कथांना||५||
जपा आरोग्य स्वतःचे
निसर्गात थोडे रमा
आयुष्याची हीच ठेव
आठवणी येती कामा||६||
