STORYMIRROR

kishor zote

Abstract

0  

kishor zote

Abstract

आभाळागत माया ( कविता )

आभाळागत माया ( कविता )

1 min
738


आईच असते लेकराची

हास्य, रडणे सर्व काही

जन्मदाती माताच असे

भावविश्व दुसरे नाही

आईचे ते दूध जणू

अमृत त्या बाळासाठी

आईचा तो प्रत्येक श्वास

फक्त तीच्या लेकरासाठी

आईच होते पहिला गुरू

मातिच्या त्या गोळ्याचा

जीवन जगणे शिकवते

देते बाळकडू संस्काराचा

आपल्या लेकरावर करी

आईच आभाळागत माया

म्हणून लेकरांनी मोठेपणी

पडावे तिच्याच हो पाया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract