आभाळ भरून आलं ...
आभाळ भरून आलं ...
आभाळ भरून आलं ,
पाणी डोळ्यांतून वाहलं ...
गरजुन गेले मेघ इथे ,
वीज मनावर पडली ,
करपून गेले प्रेमांकुर ,
बीजे मोडीला गेली ...
आभाळ भरून आलं ,
पाणी डोळ्यांतून वाहलं ...
दुष्काळ झाला नशिबाचा ,
का कोपला असा तू ,
कोणता नवस करू तुजला ,
पावशील तेव्हा भक्ताला तू ...
आभाळ भरून आलं ,
पाणी
डोळ्यांतून वाहलं ...
नीज पारखी झाली उशाला ,
रात्र दिवसा परी जागली ,
पापणी टेकत नाही पापणीला ,
अशी अवस प्रेमात आली ...
आभाळ भरून आलं ,
पाणी डोळ्यांतून वाहलं ...
प्रीत सरी कुठे लपल्या ,
भेगाळल्या प्रेमाच्या वाटा ,
चिरा-चिरा धरणीला ,
उसळला जरी समुद्रात लाटा ...
आभाळ भरून आलं ,
पाणी डोळ्यांतून वाहलं ...