२६ जानेवारी
२६ जानेवारी
आला दिवस २६ जानेवारीचा
घेऊन नवा उत्सव लोकतंत्राचा
अभिमान भारतीयांना या दिवसाचा
आंम्हा स्वतंत्र हक्क मिळाला गणतंत्राचा!!
आला दिवस २६ जानेवारीचा
तिरंगा उंच आकाशी फडकविण्याचा
मनोभावे तिरंग्याला अभिवादन करण्याचा
तिरंगा मनामनांत रुजवण्याचा!!
आला दिवस २६ जानेवारीचा
भारतभुमीत माझ्या लोकतंत्राचा वास
नको इथे मताचा वापर विपर्यास
नाही कुणाचा ऐकुन बहाणा
प्रत्येक नागरीक झाला आता शहाणा
आपले अमुल्य मत तो आता नाही विकणार
याच निश्चयाने प्रजासत्ताक दिन साजरा करणार!!
आला दिवस २६ जानेवारीचा
या दिवसासाठी झाले अनेक संघर्ष
प्रजासत्ताक मुळेच झाला लोकांचा उत्कर्ष
सारे मिळून करावी एकच प्रतिज्ञा
मानुन संविधान कुणीही करणार नाही त्याची अवाज्ञा
याच निश्चयाने प्रजासत्ताक दिन साजरा करणार !!
