Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

१९ फेब्रुवारी..

१९ फेब्रुवारी..

1 min
244


भीतीचा काळोख दाटून 

वाहे अन्यायाचा वारा ;

 सुलतानी अराजकतेत

 रयतेला नव्हता थारा .


शूर मराठ्यांच्या पदरी

फक्त बादशाहीचे दास्य ;

 हाहाकार- अंदाधुंदीने 

गाली नव्हते कोणा हास्य .


सुलतानी राजकलहामुळे

 पडे रक्ताच्या सडा ;

निष्पाप प्रजेस तारण्या 

कोण होईल खडा .


आनंदाला उधाण येऊन

 फुटले आशेला पंख ;

चौघडे -तुतारी- सनईसह 

चैतन्याच्या गुजला शंख .


सह्याद्री गर्जु लागला 

"जय भवानी "चा नाद घुमला ;

तिन्ही लोकी पूजला जाणारा 

शिवाजीराजा जन्मला .


शिवजन्माची साक्ष देतो 

अभेद्य गड शिवनेरी ;

शिवतेजाने न्हाऊन निघाला

 सोनेरी दिन 19 फेब्रुवारी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational