STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance

4  

sarika k Aiwale

Romance

शेवटच्या क्षणी ही जगले तू श्वास माझे

शेवटच्या क्षणी ही जगले तू श्वास माझे

1 min
445

एक नजर तुही पाहिलेस मला.. 

गोंधळलेले भाव उमटले या डोळा 


भेट होती शेवटचीच ती आपली 

उरली श्वासात आजही तीच मूर्ती 


मनीच्या डोही खोल आर्त स्वरात 

गूज बोलत मनी ऐकू येई कानात 


नजरेत माझ्यासाठी अश्रुंची रेलचेल 

रिती ओंजळ माझी झाले मीही हतबल 


आसवांची साठवण गिरवित भाळी कोंदण 

पायी शृंखला नभीच्याही धरेचे का मन बैचैन 


काहूर काजळी दाटले डोळ्यांत पाणी 

निरोपात मजकुर प्रेमाचा वाचला आता? 


कळले नाही का झाले मन वैरी माझे ही 

तुझ्या नजरेतील प्रितीसाठी झुरले ते ही 


शेवटचीच होती भेट आपली ठरलेली 

वाट तुझी माझी वळणावर बदललेली 


घेता ठाव मनीचा श्वास अडखळे जनात ही 

बंधनात आज मी उमगली प्रिती खरी तुझी 


असुयेत तुझ्या त्या अनाहूत जपलीस खुण 

मिळता नजरेतून कशी सुटली न कळे मज 


अबोल भावनांचा उद्रेक मनी काहूर माजले 

तू समोर असुनी मन उगाचच का झुरले 


शेवटच्या क्षणीही जगले तू श्वास माझे 

बोल होते गहिरे अन मनाने अश्रु वाहिले


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar hindi poem from Romance